जम्मू श्रीनगर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४४ सलग पाचव्या दिवशी बंद
• महेश आनंदा लोंढे
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मोठ्या प्रमाणात दरडी कोसळल्यानं आणि भूस्खलन झाल्यानं, २७० किलोमीटरचा जम्मू श्रीनगर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४४ आज सलग पाचव्या दिवशी बंद आहे. जोरदार पावसामुळ दलवास, नाश्री आणि पिधा या भागात ठिकठीकाणी रस्ता खचल्यान, हा महामार्ग वाहतूकीसाठी बंद झाला आहे.
जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक करणारी अनेक वाहनं त्यामुळं इथं आडकून पडली आहेत. रस्त्यावरील राडारोडा हटवून रस्ता दुरुस्तीचं काम करण्यासाठी संबधित यंत्रणा सातत्यानं प्रयत्न करत आहे, मात्र सतत होणाऱ्या पावसामुळ त्यात अडथळे येत आहेत. आज संध्याकाळपर्यंत या मार्गावरील वाहतूक सुरळीत करण्यासाठी युद्ध पातळीवर काम सुरू आहे.
SR. NO.9/9, MAHATMA PHULE ROAD, MALI ALI, NEAR OLD MAHADEV TEMPLE, BHOSARI, DIST-PUNE-411039, MAHARASHTRA
About
भारत सरकार मान्यता प्राप्त व महाराष्ट्रातून नियमित प्रकाशित होणारे साप्ताहिक एकच ध्येय वृत्तपत्र आहे. सामाजिक बांधिलकीतून व नागरिकांच्या अडी-अडचणी तसेच शासन व प्रशासनाच्या नागरिकांच्या कल्याणासाठी असणाऱ्या बातम्या, आमच्या वृत्तपत्रातून व www.ekachdhyeya.com या वेबसाईटवर नियमित प्रकाशित करत आहोत.