मुंबई विमानतळाची मालकी आता गौतम अदानी यांच्या कंपनीकडे


मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबई विमानतळाची मालकी आता गौतम अदानी यांच्या कंपनीकडे जाणार असून त्या बाबत होणाऱ्या व्यवहारात अदानी समुह सध्याच्या जेव्हीके कंपनी चे पन्नास टक्के समभाग विकत घेणार आहे.

त्याचबरोबर या विमानतळात असलेले दक्षिण अफ्रिकन कंपनीचेही २३ टक्के समभाग घेणार असल्यानं आता अदानी उद्योग समुहाकडे इतर सहा विमानतळांची मालकीही जाणार आहे.