राज्यातल्या मोठ्याशहरात इयत्ता अकरावीच्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेला सुरुवात


मुंबई  : मुंबई महानगर क्षेत्र, पुणे-पिंपरी चिंचवड महानगर क्षेत्र तसंच नाशिक, औरंगाबाद, अमरावती आणि नागपूर महानगरपालिका क्षेत्रातल्या इयत्ता अकरावीच्या प्रवेशासाठीच्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेला आज सुरुवात झाली.

यासाठी WWW.11thadmission.org.in या वेबसाइटद्वारे अर्ज करावा लागणार आहे. शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्या उपस्थितीत आज या प्रक्रियेला प्रारंभ झाला. या ऑनलाईन प्रक्रियेअंतर्गत राज्य शिक्षण मंडळाशी संलग्न असलेल्या सर्व कनिष्ठ महाविद्यालयांनी सहभागी होणं अनिवार्य असणार आहे.