पुणे जिल्ह्यात काल 3 हजार 94 नवे कोरोना बाधीत रुग्ण आढळले


पुणे : पुणे जिल्ह्यात काल 3 हजार 185 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. मात्र काल 3 हजार 94  नवीन कोरोना बाधीत रुग्ण आढळल्यामुळे पुण्यातल्या एकूण बाधीतांची संख्या आता 84 हजार 765 झाली आहे.

जिल्ह्यात एकूण 1 हजार 981 रुग्णांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. तर, 28 हजार 656 रुग्णांवर जिल्ह्यातल्या विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत.