पुणे विभागातील 1 लाख 61 हजार 610 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले."विभागात कोरोना बाधित 2 लाख 21 हजार 818 रुग्ण" - विभागीय आयुक्त सौरभ राव


        पुणे :- पुणे विभागातील 1 लाख 61 हजार 610 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 2 लाख 21 हजार 818 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण संख्या 54 हजार 274 इतकी आहे. कोरोनाबाधीत एकुण 5  हजार 934  रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यूचे प्रमाण 2.68 टक्के आहे. पुणे विभागामध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण 72.86 टक्के आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली.


पुणे जिल्हा


            पुणे जिल्हयातील  कोरोना बाधीत एकूण 1  लाख 60  हजार 455  रुग्णांपैकी 1  लाख 23 हजार 595  रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 33 हजार 63 आहे. कोरोनाबाधित एकूण 3 हजार  797 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण 2.37 टक्के इतके आहे तर  बरे  होणा-या रुग्णांचे प्रमाण 77.3  टक्के आहे.


सातारा जिल्हा


              सातारा जिल्हयातील  कोरोना बाधीत एकूण 12 हजार 218 रुग्णांपैकी  6  हजार  787 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या  5 हजार 74 आहे. कोरोनाबाधित एकूण 357 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.


सोलापूर जिल्हा


              सोलापूर जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 17  हजार 121  रुग्णांपैकी 12 हजार 624 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 3  हजार 781 आहे. कोरोनाबाधित एकूण  716  रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 


  सांगली जिल्हा


               सांगली  जिल्हयातील  कोरोना बाधीत एकूण 10 हजार 293  रुग्णांपैकी 5  हजार 656 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या  4 हजार 227  आहे. कोरोनाबाधित एकूण 410 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.


कोल्हापूर जिल्हा


            कोल्हापूर जिल्हयातील  कोरोना बाधीत एकूण  21 हजार 731  रुग्णांपैकी 12 हजार 948  रुग्ण  बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 8  हजार  129 आहे. कोरोनाबाधित एकूण 654  रुग्णांचा मृत्यू झाला आहे.


कालच्या रुग्णसंख्येच्या तुलनेत आज झालेली वाढ


            कालच्या बाधीत रुग्ण संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये एकूण 5  हजार 612  ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात  3 हजार 611, सातारा जिल्ह्यात 575, सोलापूर जिल्ह्यात 268, सांगली जिल्ह्यात 463 तर कोल्हापूर जिल्ह्यात 695 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.


पुणे विभागातील सर्व्हेक्षण


            आजपर्यत विभागामध्ये एकुण 10 लाख 18 हजार 428 नमून्यांचा तपासणी अहवाल प्राप्त झाला. प्राप्त अहवालांपैकी 2  लाख  21 हजार 818  नमून्यांचा अहवाल सकारात्मक (पॉझिटिव्ह) आहे.


( टिप :- दि. 28 ऑगस्ट 2020 रोजी रात्री 9.00 वा. पर्यंतच्या आकडेवारीनुसार )


Popular posts
नाशिक फाटा ते मोशी परिपूर्ण राष्ट्रीय महामार्ग अखेर दृष्टीक्षेपात !
Image
राज्यातल्या शेतकऱ्यांना एक लाख कृषी पंपांना वीज जोडणीचं राज्य सरकारचं नवीन धोरण जाहीर
Image
महिला आणि मुलींच्या न्याय व हक्कांसाठी गावोगावी जनजागृती, सौहार्दवाढीचे कार्यक्रम राबविण्यात यावेत
Image
दरदिवशी होणाऱ्या कोविड मृत्यूंपैकी 71% मृत्यू हे दिल्ली , महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, हरीयाणा, पंजाब, केरळ, उत्तर प्रदेश आणि राजस्थान या आठ राज्ये/केंद्रशासित प्रदेशांत, 22 राज्ये/केंद्रशासित प्रदेशात मृत्यू दर राष्ट्रीय सरासरीपेक्षा कमी
Image
संसद, न्यायपालिका आणि प्रशासन संविधानामुळे मजबूत असल्यानं कठिण परिस्थितही सामान्य नागरिकांचा या तीन संस्थांवर दृढ विश्वास असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन
Image