केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मेघालयमधील वेस्ट गारो हिल्स येथे पुरामुळे झालेल्या अनमोल जीवित हानीबद्दल व्यक्त केला शोक


केंद्रीय गृहमंत्र्यांनी मेघालयचे मुख्यमंत्री कॉनरड संगमा याना केंद्र सरकारकडून सर्वतोपरी मदतीचे दिले आश्वासन

या कठीण काळात संपूर्ण देश मेघालयातील लोकांसोबत आहे- अमित शाह


नवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मेघालयातील वेस्ट गारो हिल्समध्ये पुरामुळे झालेल्या अनमोल जीवित हानीबद्दल दुःख व्यक्त केले. केंद्रीय गृहमंत्र्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, “मी मुख्यमंत्री कॉनरेड संगमा यांच्याशी बोललो आणि त्यांना केंद्र सरकारकडून सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले आहे.”


अमित शहा पुढे म्हणाले की, “या कठीण काळात संपूर्ण देश मेघालयातील लोकांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे”.