फेविपराविर गोळ्यांचा अनावश्यक साठा केल्याच्या आरोपाचं महानगरपालिकेनं केलं खंडन


नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोनाबाधित रुग्णांच्या उपचारासाठी आवश्यक असलेल्या फेविपराविर या गोळ्यांची जादा दरानं खरेदी करून अनावश्यक साठा केल्याच्या आरोपाचं महानगरपालिकेनं खंडन केलं आहे.

या गोळ्यांची खरेदी राज्या शासनाच्या वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालयाच्या  परिपत्रकाप्रमाणे आणि त्यांनी निश्चित करून दिलेल्या दराप्रमाणेच झाल्याचंही महानगरपालि्ेकेनं म्हटलं आहे. औषधांचा दहा दिवस पुरेल ईतकाच साठा करण्याच्या आदेशांमुळे अतिरिक्त साठा केल्याचा आरोपही निराधार असल्याचं पालिकेनं म्हटलं आहे.