अन्न व औषध प्रशासन मंत्री डाॅ. राजेंद्र शिंगणे यांनी दिली रूग्णालयांना भेट


मुंबई : अन्न व औषध प्रशासन मंत्री राजेंद्र शिंगणे यांनी आज मुंबईतील रहेजा व हिंदूजा या रूग्णालयांना भेट देऊन पाहणी केली.


कोविड-१९ च्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर डॉ. शिंगणे यांनी दोन्ही रूग्णालयांमध्ये असलेल्या सुविधा त्याच प्रमाणे उपलब्ध औषधांचा साठा याची तपासणी केली. सामान्य रूग्णांना योग्य औषधोपचार मिळावेत त्याचप्रमाणे रूग्णालयांनी स्वच्छतेचे निकष पाळावे या बाबत त्यांनी सूचनाही केल्या.


कोरोनाची लक्षणे जाणवताच डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधोपचार सुरू करावेत. औषधांच्या उपलब्धतेबाबत काही तक्रार असल्यास प्रशासनास लक्षात आणून द्यावे. यासाठी १८००२२२३६५ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन त्यांनी या निमित्ताने सर्व सामान्य जनतेला केले आहे.