भारतात कोरोनावरील लसीचे मानवावरील प्रयोग सुरू


नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोनावरील लस विकसीत करण्याच्या प्रयत्नांना भारतात वेग आला असून लसीचे मानवावरील प्रयोग सुरू झाले असल्याचं भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेनं, म्हणजेच आयसीएमआरनं सांगितलं आहे.

कोरोना विषाणूचा यकृत, मूत्रपिंड, हृद्य आणि रक्तवाहिन्या अशा अवयवांवर परिणाम होत असल्यानं उपचार करताना पुरेशी काळजी घेतली जात असल्याचं यावेळी सांगण्यात आलं.


लस विकसीत होण्याच्या प्रक्रियेला अजिबात विलंब होत नसून कोणत्याही नैतिक मूल्यांशी तडजोड न करता ती विकसीत केली जात असल्याचं आयसीएमआरनं स्पष्ट केले.