युनियन बँक ऑफ इंडियाद्वारे नव्या संघटनात्मक रचनेची घोषणा
• महेश आनंदा लोंढे
संपूर्ण भारतात दमदार उपस्थिती दर्शवण्यासाठी तसेच व्यापार वृद्धीत वेग घेण्याची योजना
मुंबई : युनियन बँक ऑफ इंडियामध्ये आंध्रा बँक आणि कॉर्पोरेशन बँकेच्या यशस्वी विलीनीकरणानंतर ही भारतातील ५व्या क्रमांकाची सर्वात मोठी सार्वजनिक क्षेत्रातील बँक बनली आहे. या पार्श्वभूमीवर युनियन बँक ऑफ इंडियाने आपल्या नव्या संयुक्त, संघटनात्मक आराखड्याची घोषणा केली आहे. यात १८ विभागीय कार्यालये आणि १२५ क्षेत्रीय कार्यालयांचा समावेश असेल. सर्व भौगोलिक क्षेत्रांमध्ये आपली व्याप्ती वाढवण्याच्या धोरणात्मक दृष्टीकोनातून चंदीगड, जयपूर, मंगलोर, विशाखापट्टणम्मध्ये ४ नवे विभागीय कार्यालय स्थापन करण्यात आले आहेत.
दक्षिण भारतात दोन नवे विभागीय कार्यालय सुरु केल्याने बँकेला या महत्त्वपूर्ण क्षेत्रात बाजारातील वाटा अधिक बळकट करता येईल. यासह शिमला, अमृतसर, बरेली, मऊ आदी ठिकाणी ३२ नवे प्रादेशिक कार्यालये सुरू होणार आहेत. संपूर्ण भारतात दमदार हजेरीसह बँकेच्या विभागीय आणि प्रादेशिक कार्यालयांना ग्रोथ इंजिनच्या स्वरुपात उभारण्याची यामागील कल्पना आहे. विलीनीकरणानंतर युनियन बँक ऑफ इंडियाच्या व्याप्तीमध्ये वृद्धी होऊन ९५००+ शाखा आणि १३,५००+ एटीएमच्या अखिल भारतीय नेटवर्कपर्यंत झाली आहे.
युनियन बँक ऑफ इंडियाचे एमडी आणि सीईओ श्री राजकिरण राय यांनी सांगितले की, 'विलीनीकरणानंतर आपली व्याप्ती वाढवण्यासह पुढील संधींचा योग्य प्रकारे लाभ मिळवण्यासाठी एका धोरणात्मक आराखड्याची आवश्यकता आहे. हे लक्षात घेत, आम्ही उज्ज्वल भवितव्यात व्यापारी वृ्द्धी आणि ग्राहक सेवेवर लक्ष केंद्रीत करण्याची सुनिश्चिती करण्याकरिता संपूर्ण भारतात आमची दमदार उपस्थिती दर्शवत आहोत.'
SR. NO.9/9, MAHATMA PHULE ROAD, MALI ALI, NEAR OLD MAHADEV TEMPLE, BHOSARI, DIST-PUNE-411039, MAHARASHTRA
About
भारत सरकार मान्यता प्राप्त व महाराष्ट्रातून नियमित प्रकाशित होणारे साप्ताहिक एकच ध्येय वृत्तपत्र आहे. सामाजिक बांधिलकीतून व नागरिकांच्या अडी-अडचणी तसेच शासन व प्रशासनाच्या नागरिकांच्या कल्याणासाठी असणाऱ्या बातम्या, आमच्या वृत्तपत्रातून व www.ekachdhyeya.com या वेबसाईटवर नियमित प्रकाशित करत आहोत.