८२२ विशेष श्रमिक ट्रेनद्वारे १२ लाख परप्रांतिय कामगारांना स्वगृही पाठविले – गृहमंत्री अनिल देशमुख
• महेश आनंदा लोंढे
मुंबई : महाराष्ट्रात विशेष करुन मुंबई मध्ये परराज्यातून आलेल्या कामगारांना त्यांच्या स्व:गृही परत जाण्यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. एक मे एक जून या महिनाभरात जवळपास ११ लाख ८६ हजार २१२ परप्रांतीय कामगारांना स्व:गृही परत पाठविण्यात आले. यासाठी ८२२ विशेष श्रमिक ट्रेन महाराष्ट्रातील विविध भागातून सोडण्यात आल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली.
विविध राज्यात गेलेल्या विशेष श्रमिक ट्रेन
आतापर्यंत उत्तर प्रदेशमध्ये ४५० बिहारमध्ये १७७, मध्यप्रदेशमध्ये ३४, झारखंडमध्ये ३२, कर्नाटक मध्ये ६, ओरिसामध्ये १७, राजस्थान २०, पश्चिम बंगाल ४७, छत्तीसगडमध्ये ६ यासह इतर राज्यांमध्ये एकूण ८२२ ट्रेन या सोडण्यात आलेल्या आहेत.
राज्यातील सर्वच रेल्वे स्टेशन मधून या ट्रेन सोडण्यात येत असून यात प्रमुख्याने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल (सीएसएमटी) मधून १३६, लोकमान्य टिळक टर्मिनल १५४, पनवेल ४५, भिवंडी ११, बोरीवली ७१, कल्याण १४, ठाणे ३७, बांद्रा टर्मिनल ६४, पुणे ७८, कोल्हापूर २५, सातारा १४, औरंगाबाद १२, नागपुर १४ यासह राज्यातील इतर रेल्वे स्टेशन वरून विशेष श्रमिक ट्रेन सोडण्यात आल्याचे श्री. देशमुख यांनी सांगितले.
SR. NO.9/9, MAHATMA PHULE ROAD, MALI ALI, NEAR OLD MAHADEV TEMPLE, BHOSARI, DIST-PUNE-411039, MAHARASHTRA
About
भारत सरकार मान्यता प्राप्त व महाराष्ट्रातून नियमित प्रकाशित होणारे साप्ताहिक एकच ध्येय वृत्तपत्र आहे. सामाजिक बांधिलकीतून व नागरिकांच्या अडी-अडचणी तसेच शासन व प्रशासनाच्या नागरिकांच्या कल्याणासाठी असणाऱ्या बातम्या, आमच्या वृत्तपत्रातून व www.ekachdhyeya.com या वेबसाईटवर नियमित प्रकाशित करत आहोत.