गडचिरोली जिल्ह्यात नक्षलवाद्यांकडून मालट्रक्सची जाळपोळ
• महेश आनंदा लोंढे
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : गडचिरोली जिल्ह्यात नक्षली अतिरेक्यांनी काल ४ मालवाहू ट्रक्स जाळल्याचं आज पोलिसांनी सांगितलं.
नक्षली कमांडर सृजनक्का १ मे रोजी पोलीस चकमकीत ठार झाली. तिच्या नावावर १५५ गंभीर गुन्ह्यांची नोंद होती. त्याच्या निषेधार्थ या भागात आज अतिरेक्यांनी बंद पुकारला आहे. धानोरा तालुक्यात सावरगाव- मुरुमगाव रस्त्यावर वाहतूक रोखून नक्षल्यांनी ४ ट्रक्सना आग लावली.
गेल्या रविवारी पोयारकोटी - कोपर्शीच्या जंगलात झालेल्या चकमकीत २ पोलीस शहीद झाले तर ३ जखमी झाले होते.
SR. NO.9/9, MAHATMA PHULE ROAD, MALI ALI, NEAR OLD MAHADEV TEMPLE, BHOSARI, DIST-PUNE-411039, MAHARASHTRA
About
भारत सरकार मान्यता प्राप्त व महाराष्ट्रातून नियमित प्रकाशित होणारे साप्ताहिक एकच ध्येय वृत्तपत्र आहे. सामाजिक बांधिलकीतून व नागरिकांच्या अडी-अडचणी तसेच शासन व प्रशासनाच्या नागरिकांच्या कल्याणासाठी असणाऱ्या बातम्या, आमच्या वृत्तपत्रातून व www.ekachdhyeya.com या वेबसाईटवर नियमित प्रकाशित करत आहोत.