बेकायदेशीर डान्स-बारवर छापे टाकून कारवाई करावी - विजय वडेट्टीवार

 

मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबईतल्या बेकायदेशीर  डान्स-बार वर छापे टाकून कडक कारवाई करावी अशी मागणी विधानसभेचे विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. याबाबत स्थानिक पोलिसांकडे तक्रार करूनही कोणतीही कारवाई होत नसून डान्स-बार चालक तक्रारदाराला धमकी देत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. ऑर्केस्ट्राच्या नावाखाली सुरु असलेल्या अशा डान्स-बार वर तात्काळ कारवाई करावी अशी मागणी वडेट्टीवार यांनी मुंबईत जारी केलेल्या निवेदनात केली आहे.