एअर इंडियाला कारणे दाखवा नोटीस

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नागरी विमान वाहतूक महासंचालनालयानं, एअर इंडियाला विमान नियम १९३७चं पालन न केल्याबद्दल कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. मुंबई विमानतळावर व्हीलचेअर न मिळाल्यामुळे प्रवाशाचा कोसळून मृत्यू झाल्याची घटना घडली. या कारणामुळे डीजीसीएनं नोटीस जारी करून, एअर इंडियाला सात दिवसांत उत्तर देण्यास सांगितलं आहे. विमान कंपन्यांनी अपंग व्यक्ती आणि चालण्याची क्षमता नसलेल्या प्रवाशांना विमानतळावर आल्यापासून प्रवास संपेपर्यंत मदत करण्यासाठीचे निर्देश दिले आहेत. अशा प्रवाशांना विमानात बसताना किंवा उतरताना त्यांच्यासाठी पुरेशा संख्येनं व्हीलचेअर उपलब्ध करून देण्याचे निर्देशही विमान कंपन्यांना देण्यात आले आहेत.