डिजीटल व्यासपीठांवर आशय निर्मिती करणाऱ्या समुदायानं राष्ट्रीय क्रिएटर्स पुरस्कारासाठी अर्ज करावेत असं प्रधानमंत्र्यांचं आवाहन

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) डिजीटल व्यासपीठांवर आशय निर्मिती करणाऱ्या समुदायानं राष्ट्रीय क्रिएटर्स पुरस्कारासाठी अर्ज करावेत असं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. हे पुरस्कार म्हणजे अशाप्रकारे आशय निर्मिती करणाऱ्या समुदायासाठीची मोठी संधी असल्याचं प्रधानमंत्र्यांनी यासंदर्भात समाजमाध्यमांवरच्या आपल्या संदेशात म्हटलं आहे. या पुरस्काराअंतर्गत विविध २० श्रेणींमध्ये पुरस्कार दिले जाणार असून, त्यासाठी येत्या २१ फेब्रुवारीपर्यंत माय जीओव्ही डॉट कॉम (MyGov.com) या संकेतस्थळावर अर्ज दाखल करता येणार आहेत.