विकसित भारत संकल्प यात्रेदरम्यान सरकारनं देशभरात १ कोटी ६४ लाखांहून अधिक आयुष्मान कार्ड वितरित

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) विकसित भारत संकल्प यात्रेदरम्यान सरकारनं देशभरात १ कोटी ६४ लाखांहून अधिक आयुष्मान कार्ड वितरित केली आहेत. या कार्डांच्या माध्यमातून देशातल्या प्रत्येक कुटुंबाला प्रत्येक वर्षी ५ लाख रुपयांइतक्या मूल्याच्या  आरोग्य विम्याचा लाभ मिळणार आहे.

या यात्रेच्या माध्यमातून सरकारच्या विविध योजनांबद्दल जनजागृती सुरू आहे. सांगली जिल्ह्यातल्या जननी सुरक्षा योजनेच्या लाभार्थी प्रतीक्षा वाघमारे यांनी आकाशवाणी कडे प्रतिक्रिया व्यक्त केली.