नागरिकांच्या आरोग्यासाठी "राईट टू हेल्थ" कायदा आणणार-आरोग्यमंत्री तानाजी सावंत

 

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यातल्या नागरिकांचं आरोग्य सुदृढ राहावं यासाठी लवकरच "राईट टू हेल्थ" कायदा आणणार असल्याचं सार्वजनिक आरोग्य आणि कुटूंब कल्याण मंत्री डॉ.तानाजी सावंत यांनी सांगितलं आहे.काल धाराशिव इथं शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात ५० खाटांचे अतिदक्षता कक्ष,अत्याधुनिक प्रयोगशाळा आदी विकास कामांचे भूमिपूजन सावंत यांच्या हस्ते झालं,त्यावेळी ते बोलत होते.सावंत यांच्या हस्ते परंडा इथंही १०० खाटांचं उपजिल्हा रुग्णालय आणि १०० खाटांच्या महिला रुग्णालयाचं भूमिपूजन काल करण्यात आलं.