राजनाथ सिंह यांनी जम्मू आणि काश्मिर मध्ये राष्ट्रीय छात्र सेनेच्या आणखी चार तुकड्या वाढवण्याच्या प्रस्तावाला मंजुरी

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी जम्मू आणि काश्मिर मध्ये राष्ट्रीय छात्र सेनेच्या आणखी चार तुकड्या वाढवण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. यामध्ये काश्मिर मध्ये उधमपूर आणि कुपवाडा, लडाखमध्ये कारगील इथं मुला-मुलींच्या मिश्र बटालियनचा यात समावेश आहे. तसंच उधमपूर मध्ये हवाई पथकाचा ही यात समावेश आहे. सध्या छात्रसैनिकांची संख्या २७ हजार आठशे सत्तर असून या मंजुरीमुळे छात्रसैनिकांच्या संख्येत बारा हजार आठशे साठ एवढी वाढ होणार आहे.