ओएनजीसीकडून कृष्णा-गोदावरी खोऱ्यातल्या तेलविहिरीतून तेलउत्खनन सुरु

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) ओएनजीसीनं बंगालच्या उपसागरातल्या आपल्या क्रिष्णा गोदावरी या खोऱ्यातल्या तेलविहिरीतून तेल काढायला सुरुवात केली आहे. या प्रकल्पातल्या क्लस्टर २ मधून तेलाचे उत्पादन सुरु करण्यात आले असून हळू हळू ते वाढेल. या तेलविहिरीतून दिवसाला ४५ हजार बॅरेल तेलाचं उत्पादन होईल अशी माहिती पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायु मंत्री हरदिप सिंग पुरी यांनी दिली आहे.

या ठिकाणाहून दिवसाला १ लाख क्युबिक मिटर नैसर्गिक वायुचेही उत्पादन होण्याची शक्यता असल्याचही त्यांनी म्हटलं आहे. या मुळे देशाच्या सध्याच्या तेल आणि वायुच्या उत्पादनात ७ टक्क्यांनी वाढ होणार आहे.