संरक्षण मंत्री राजनाथ सिंग आणि ब्रिटनचे प्रधानमंत्री ऋषी सुनक यांच्यात चर्चा

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी ब्रिटनचे प्रधानमंत्री ऋषी सुनक यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी संरक्षण, सुरक्षा तसंच आर्थिक सहकार्य यासारख्या महत्वाच्या विषयांवर चर्चा केली. ब्रिटन आणि भारताने व्यापार, संरक्षण आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात एकत्र काम करण्याबद्दल सिंग  आणि सुनक यांचं एकमत झालं. 

सिंग यांनी ब्रिटनचे परराष्ट्र मंत्री लॉर्ड डैव्हिड कॅमेरुन यांचीही भेट घेतली.  त्यानंतर सिंग हे लंडन हाऊस इथं भारतीय समुदायाने आयोजित केलेल्या कार्यक्रमात सहभागी झाले.  या कार्यक्रमात संबोधित करताना त्यांनी चीन सरकारच्या ग्लोबल टाइम्स या नियतकालिकात भारतावर आलेल्या लेखाचा उल्लेख केला.  विकास आणि धोरणात्मक बाबतीत भारताचे स्थान जागतिक स्तरावर उंचावल्याचं  या लेखात म्हटलं आहे.भारताची  आर्थिक तसं परराष्ट्रविषयक धोरणं यात झालेला बदल चीनने स्वीकारल्याचं यावरून दिसतं, सिंग  यावेळी म्हणाले.