क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेआणि राणी वेलू नाचियार यांच्या जयंतीनिमित्त प्रधानमंत्र्यांनी आदरांजली वाहिली

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : समाजसुधारक सावित्रीबाई फुले आणि भारतातल्या ब्रिटीश वसाहतीविरूध्द लढणाऱ्या राणी वेलू नाचियार यांची आज जयंती आहे. यानिमित्त प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी त्यांना आदरांजली वाहिली आहे. या दोन्ही स्त्रियांनी देशासाठी दिलेले योगदान अमूल्य असून आपल्या धैर्यानं आणि करुणेनं त्यांनी समाजाला प्रेरणा दिली आहे, असं प्रधानमंत्री मोदी यांनी समाज माध्यमावर केलेल्या पोस्ट मध्ये म्हटलं आहे. 

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वर्षा निवासस्थानी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केलं. मंत्रालयात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केलं. 

Popular posts
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image
तरुणांनी यशासाठी भव्य शक्यतांच्या अवकाशाचा शोध घेतला पाहिजे - उपराष्ट्रपती
Image
अंदमान निकोबार बेटं भारताला आग्नेय आशियाबरोबर जोडणारा दुवा
Image