'तेहरिक ए हुर्रियत' ही जम्मू कश्मीरमधली संघटना बेकायदेशीर घोषित

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्र सरकारने तेहरिक ए हुर्रियत ही जम्मू कश्मीरमधली संघटना बेकायदेशीर घोषित केली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी  समाजमाध्यमावर ही माहिती दिली. भारतविरोधी कार्यक्रम राबवत जम्मू काश्मीरला भारतापासून वेगळं करण्यासाठी  ही संघटना अनेक गैरकृत्यं करत असल्याचं शाह यांनी या पोस्टमध्ये म्हटलं आहे.