इंडिया आघाडीकडे विकासाचं कोणतंही धोरण नसल्यानं त्यांच्यात विसंवाद - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 

मुंबई (वृत्तसंस्था) : इंडिया आघाडीकडे विकासाचं कोणतंही धोरण नसल्यानं त्यांच्यात विसंवाद असल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. ते आज नागपुरात भाजपा प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत बोलत होते. देशाची सूत्र प्रधानमंत्री नरेंद्र मोदींकडे देण्याचं जनतेच्या मनात असून पुन्हा मोदी सरकारच येणार असल्याचं ते म्हणाले. आगामी निवडणुका भाजपा मित्र पक्षांच्या साथीने लढवणार असून जागा वाटपात कोणत्याही अडचणी नसल्याचं फडणवीस  यांनी यावेळी सांगितलं.