शिवसेना आमदार अपात्रेच्या सुनावणीसाठी विधानसभा अध्यक्षांना १० जानेवारीपर्यंत मुदतवाढ

 

मुंबई (वृत्तसंस्था) : शिवसेना आमदार अपात्रेच्या सुनावणीसाठी सर्वोच्च न्यायालयानं विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना १० जानेवारीपर्यंत मुदतवाढ दिली आहे. न्यायालयानं या प्रकरणी ३१ डिसेंबर पर्यंत मुदत दिली होती. मात्र या मुदतीमध्ये निकाल देणं अशक्य असल्याचं सांगून नार्वेकर यांनी सर्वोच्च न्यायालयानं मुदत वाढवून द्यावी अशी विनंती केली होती.