दाऊदच्या नातेवाईकाच्या लग्न सोहळ्यात मंत्री, आमदार, पोलीस अधिकारी सहभागी झाल्याचा विरोधी पक्षाचा आरोप

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) दाऊदच्या नातेवाईकाच्या लग्न सोहळ्यात मंत्री, आमदार, पोलीस अधिकारी सहभागी झाल्याचा आरोप करत विरोधी पक्षाच्या सदस्यांनी केल्यामुळे झालेल्या गदारोळामुळे विधानपरिषदेचं कामकाज आज १० मिनिटं तहकूब करावं लागलं. पुन्हा सभागृह सुरू झाल्यानंतरही विरोधकांनी घोषणाबाजी सुरु ठेवली. या संदर्भात सरकारनं SIT विशेष तपास पथक स्थापन करायचा निर्णय घेतला असून, सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, असं मंत्री शंभुराज देसाई यांनी सांगितलं. सरकारमधल्या कोणत्याही मंत्र्यांचा यामध्ये सहभागी नाही, असं ते म्हणाले.  प्रिया सिंह प्रकरणी आरोपी अश्वजीत गायकवाड आणि इतरांवर कडक कलमं लावली नाहीत, असं विरोधी पक्षनेते अम्बादास दानवे म्हणाले. पीडितेनंही पोलिसांवर हाच आरोप केला असल्याचं त्यांनी सांगितलं.