देशाच्या संसदेवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात बलिदान देणाऱ्या शहिदांना आज देशभरातून श्रद्धांजली

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशाच्या संसदेवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात बलिदान देणाऱ्या शहिदांना आज देशभर श्रद्धांजली वाहिली जात आहे. आज संसद भवन परिसरात या हल्ल्यातल्या शहिदांना आदरांजली वाहण्यात आली. दहशतवादी हल्ला निष्प्रभ ठरवणाऱ्यांप्रति देश सदैव ऋणी राहील तसंच त्यांचं बलिदान व्यर्थ जाणार नाही, अशा शब्दात राष्ट्रपति द्रौपदी मुर्मु यांनी नऊ शहीद सुरक्षा रक्षकांना प्रसार माध्यमाद्वारे श्रद्धांजली वाहिली आहे. सुरक्षा रक्षकांचं धाडस आणि बलिदानाला देश कधीही विसरणार नाही, अशा शब्दात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आदरांजली वाहिली आहे.

सुरक्षा रक्षकांचं शौर्य आणि बलिदानाप्रती देश कायम कृतज्ञ राहील, या शब्दात संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी श्रद्धांजली वाहिली आहे. उपराष्ट्रपती जगदीप धनखड, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे, पी, नड्डा, केंद्रीय मंत्री पियुष गोयल, प्रल्हाद जोशी आदींनी उपस्थित राहून शहिदांना आदरांजली वाहिली आहे.