कलम ३७० आणि ३५ अ संदर्भात सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या निकालामुळे घटनात्मक एकात्मता वाढल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन
• महेश आनंदा लोंढे
नवी दिल्ली(वृत्तसंस्था): कलम ३७० आणि ३५ अ संदर्भात सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामुळे घटनात्मक एकात्मता वाढल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी एका ब्लॉगवरच्या लेखात म्हटलं आहे. सर्वोच्च न्यायालयाने कलम ३७० आणि ३५ अ रद्द करण्याबाबत ऐतिहासिक निर्णय दिला असल्याचं त्यांनी या लेखात नमूद केलं आहे. काश्मीर ने सात दशकांपासून हिंसाचार आणि अस्थिरतेचे सर्वात वाईट स्वरूप पाहिले आहे. लहानपणापासूनच जम्मू-काश्मीर आंदोलनाशी जोडण्याची संधी मिळाली असल्याचं मोदी यांनी या लेखात म्हटलं आहे.
SR. NO.9/9, MAHATMA PHULE ROAD, MALI ALI, NEAR OLD MAHADEV TEMPLE, BHOSARI, DIST-PUNE-411039, MAHARASHTRA
About
भारत सरकार मान्यता प्राप्त व महाराष्ट्रातून नियमित प्रकाशित होणारे साप्ताहिक एकच ध्येय वृत्तपत्र आहे. सामाजिक बांधिलकीतून व नागरिकांच्या अडी-अडचणी तसेच शासन व प्रशासनाच्या नागरिकांच्या कल्याणासाठी असणाऱ्या बातम्या, आमच्या वृत्तपत्रातून व www.ekachdhyeya.com या वेबसाईटवर नियमित प्रकाशित करत आहोत.