भारतासह ३३ देशांच्या नागरिकांसाठी व्हिसाची अट रद्द करण्याचा इराणचा निर्णय

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) इराणनं भारतासह आणखी ३३ देशांच्या नागरिकांसाठी व्हिसाची अट एकतर्फी रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.  रशिया, सौदी अरेबिया, कतार, जपान आणि संयुक्त अरब अमिरात या देशांचाही या यादीत समावेश आहे. जगभरातल्या प्रवाशांना आकर्षित करण्याच्या उद्देशानं इराणनं हा निर्णय घेतला असून, त्यामुळे  आता जगातल्या ४५ देशांचे नागरिक इराणला व्हिसा शिवाय भेट देऊ शकतील.