राज्यात अवकाळी पावसानं ३ लाख ९३ हजार हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रावरच्या पिकांचं नुकसान
• महेश आनंदा लोंढे
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात गेल्या काही दिवसात झालेल्या अवकाळी पावसानं ३ लाख ९३ हजाराहून अधिक हेक्टरवरच्या शेतीचं नुकसान झालं आहे. राज्य सरकारकडे दाखल कालपर्यंच्या प्राथमिक अहवालात हे नमूद केलंय. सर्वाधिक नुकसान यवतमाळ जिल्ह्यात झालं असून इथं सव्वा लाख हेक्टर पेक्षा अधिक शेतीचं नुकसान झालं. त्यानंतर हिंगोली, बुलडाणा, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, अहमदनगर, जालना जिल्ह्यात शेतीच्या १० हजार हेक्टरहून अधिक शेतीचं नुकसान झालं. राज्यातल्या एकूण २२ जिल्ह्यांमधल्या शेतीला अवकाळी पावसाचा फटका बसला. यात प्रामुख्यानं तूर, हरभरा, कापूस, गहू, भाजीपाला, फळपीकांचं नुकसान झालं.
SR. NO.9/9, MAHATMA PHULE ROAD, MALI ALI, NEAR OLD MAHADEV TEMPLE, BHOSARI, DIST-PUNE-411039, MAHARASHTRA
About
भारत सरकार मान्यता प्राप्त व महाराष्ट्रातून नियमित प्रकाशित होणारे साप्ताहिक एकच ध्येय वृत्तपत्र आहे. सामाजिक बांधिलकीतून व नागरिकांच्या अडी-अडचणी तसेच शासन व प्रशासनाच्या नागरिकांच्या कल्याणासाठी असणाऱ्या बातम्या, आमच्या वृत्तपत्रातून व www.ekachdhyeya.com या वेबसाईटवर नियमित प्रकाशित करत आहोत.