हिंसाचार करणाऱ्यांविरुद्ध सरकारनं ठाम भूमिका घ्यायला हवी - छगन भुजबळ

 

मुंबई (वृत्तसंस्था) : हिंसाचार करणाऱ्यांविरुद्ध सरकारनं ठाम भूमिका घ्यायला हवी, असं मंत्री छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे. बीड इथं नुकत्याच झालेल्या हिंसाचाराच्या घटनांची काल पाहणी केल्यानंतर ते बोलत होते. बीडमध्ये जे काही घडलं ते दुर्दैवी असून, हे पोलीस यंत्रणेचं अपयश असल्याचं, त्यांनी नमूद केलं. या प्रकरणाच्या मुळाशी गेलं पाहिजे, अशी मागणी त्यांनी यावेळी केली.