देशात सेंद्रीय शेतीला प्रोत्साहन देण्याची गरज - केंद्रीय मंत्री अमित शाह

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात सेंद्रीय शेतीला प्रोत्साहन देण्याची गरज केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह यांनी व्यक्त केली आहे. ते आज नवी दिल्लीत सहकारी संस्थांद्वारे सेंद्रीय उत्पादनांना प्रोत्साहन देण्याबाबत आयोजित राष्ट्रीय परिषदेत बोलत होते. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव काळात भारताला आत्मनिर्भर करण्यासाठी विविध लक्ष्य प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी निश्चित केले आहेत. सेंद्रीय शेती हे त्यापैकी एक असल्याचं त्यांनी सांगितलं.

 देशात पन्नास टक्के सेंद्रीय शेतीचं उद्दिष्ट गाठण्यासाठी बहुमितीय दृष्टिकोन स्वीकारणं गरजेचं आहे, असं ते म्हणाले. कीडनाशकांच्या अतिरिक्त वापराचे विपरित परिणाम अधोरेखित करत, हा वापर कमी करण्याची आणि त्याचवेळी उत्पादन वाढवण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.