ऍपल कंपनीनं दिलेल्या इशाऱ्यावर काही विरोधी नेत्यांच्या कथित दाव्यांबाबत सरकारचे चौकशीचे आदेश

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : काही कथित सरकारपुरस्कृत हॅकर्स मोबाईलवर हल्ले करू शकतात अशा ऍपल कंपनीनं दिलेल्या इशाऱ्यावर काही विरोधी नेत्यांच्या कथित दाव्यांबाबत सरकारनं चौकशीचा आदेश दिला आहे. सरकार या बाबतीत गंभीर असून, या प्रकरणाच्या मुळाशी जाईल, असं केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती-तंत्रज्ञान मंत्री आश्विनी वैष्णव यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं. देशात काही जण सरकारचे टीकाकार असून, ते प्रत्येक मुद्द्यावर सरकारवर टीका करत असतात असं ते म्हणाले. या प्रकरणी ऍपलनं दिलेली माहिती संदिग्ध आणि अपुरी असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.