२२ बेकायदा बेटिंग ॲप्स आणि संकेतस्थळांवर बंदी घालण्याचे मंत्रालयाचे आदेश

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयानं काल २२ बेकायदा बेटिंग ॲप्स  आणि संकेतस्थळांवर बंदी घालण्याचे आदेश जारी केले. या यादीत महादेव बुकचाही समावेश आहे. अंमलबजावणी संचालनालयानं बेकायदा बेटिंग ॲप्सच्या विरोधात केलेली कारवाई आणि महादेव बुकवर छत्तीसगडमध्ये टाकलेल्या छाप्यांनंतर ही कारवाई करण्यात आली. महादेव बुकचे मालक सध्या कोठडीत आहेत. माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या आधारे संबंधित संकेतस्थळ आणि ॲप बंद करण्याची शिफारस करण्याचा पूर्ण अधिकार छत्तीसगड सरकारला होता, पण त्यांनी तसं केलं नाही, असा आरोप इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांनी केला. अशा प्रकारची पहिली शिफारस अंमलबजावणी संचालनालयाकडून आल्याचं आणि त्यावर कारवाई झाल्याचंही त्यांनी नमूद केलं.