आयुर्वेद केवळ चिक‍ित्‍सा पद्धती नसून आपले जीवनशैली असल्याचं नितीन गडकरी यांचं प्रतिपादन

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) आयुर्वेद, योगविज्ञान, युनानी ही आपली संस्‍कृती असून त्‍याला जगात मान्‍यता म‍िळालेली आहे. आयुर्वेद केवळ चिक‍ित्‍सा पद्धती नसून आपले जीवनशैली आहे, असं केंद्रिय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे. ते आज आयुष मंत्रालय, भारत सरकारच्‍या अंतर्गत कार्यरत केंद्रीय आयुर्वेदिक विज्ञान अनुसंधान परिषद, नवी दिल्‍लीद्वारे संचालित क्षेत्रीय आयुर्वेदिक अनुसंधान संस्थान, नंदनवनच्या वतीनं  आणि ८ व्‍या आयुर्वेद दिनाचे औचित्‍य साधून नागपूरात काढलेल्या भव्‍य रॅलीला दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून शुभेच्छा देतांना बोलत होते. ‍यावेळी क्षेत्रीय आयुवेद‍िक अनुसंधान संस्‍थानचे सहायक संचालक डॉ. म‍िलिंद सुर्यवंशीही उपस्थित होते. या रॅलीमध्ये हजारोंचा सहभाग होता. 

Popular posts
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
बारावीच्या परीक्षांना उद्यापासून सुरुवात
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image
न्यायालयात न टिकणारे आरक्षण देऊन मराठा समाजाची फसवणूक केल्याचा विजय वडेट्टीवार यांचा आरोप
Image