दिवाळीच्या हंगामात एसटीची १० टक्के भाडेवाढ

 

मुंबई (वृत्तसंस्था) : एसटी, अर्थात राज्य मार्ग परिवहन महामंडळानं, दरवर्षी प्रमाणे महसूल वाढीसाठी परिवर्तनशील हंगामी भाडेवाढ सूत्रानुसार, या दिवाळीच्या हंगामात, १० टक्के भाडेवाढ करण्याचा निर्णय घेतलेला आहे. 

ही भाडेवाढ सर्व प्रकारच्या बस तिकीटांच्या दरात सरसकट केली असून, ती ७ नोव्हेंबर च्या मध्यरात्रीपासून म्हणजे ८ नोव्हेंबर ते २७ नोव्हेंबर दरम्यान लागू राहणार आहे. त्यानंतर मूळ तिकीट दराप्रमाणे तिकीट आकारणी सुरू होईल. ज्या प्रवाशांनी आगाऊ तिकीट आरक्षण केलं आहे, त्यांना तिकीटाची उर्वरित फरकाची रक्कम प्रत्यक्ष प्रवास करताना वाहकाकडे भरावी लागणार आहे.