लाच मागितल्या प्रकरणी सेन्सॉर बोर्डाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांसह तिघांविरोधात सीबीआयकडून गुन्हा दाखल

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) चित्रपट प्रदर्शनासाठी आवश्यक प्रमाणपत्र देण्याकरता लाच घेतल्याप्रकरणी सीबीआयनं काही जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. यात ३ व्यक्ती आणि CBFC, अर्थात केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाच्या काही अधिकारी-कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. हिंदीत डब करण्यात आलेल्या एका चित्रपटाला सप्टेंबर २०२३ मध्ये सेन्सॉर बोर्डाकडून प्रमाणपत्र मिळवण्यासाठी ७ लाख रुपयांची लाच स्वीकारल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. याप्रकरणी मुंबईसह ४ ठिकाणी सीबीआयनं छापे टाकले असून काही कागदपत्र गोळा केली आहेत.

Popular posts
सिक्कीममधील पुरात १४ जणांचा मृत्यू, १०२ जण बेपत्ता
Image
‘वसुधैव कुटुंबकम्’चे उद्दिष्ट गाठण्यासाठी योग सहाय्यक - राज्यपाल
Image
करगिल युद्धातील विजयाच्या २२ व्या स्मृतीदिनानिमित्त देशभर विविध कार्यक्रमांद्वारे हुतात्म्यांना अभिवादन
Image
दावा न केलेल्या ठेवी शोधून त्या लाभार्थ्यांना परत मिळवून देण्यासाठी केंद्रीकृत संकेतस्थळ विकसित करण्याची भारतीय रिझर्व बँकेची घोषणा
Image
'इंद्रायणी स्वच्छता' जनजागृती मोहिमेअंतर्गत रीव्हर 'सायक्लोथॉन २०२२' रॅलीचे रविवारी आयोजन
Image