सामान्य जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी राज्य शासनाकडून आता जनता दरबार

 मुंबई (वृत्तसंस्था) : शिवसेनेच्या नऊ मंत्र्यानी आठवड्यातून ५ दिवस जनता दरबार भरवून सर्व सामान्य जनतेचे प्रश्न सोडवावेत,असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं आहे.त्यानुसार दादा भुसे आणि उदय सामंत दर सोमवारी,शंभुराज देसाई आणि संदिपान भुमरे दर मंगळवारी,दीपक केसरकर आणि तानाजी सावंत दर बुधवारी,अब्दुल सत्तार आणि गुलाबराव पाटील दर गुरुवारी तर संजय राठोड दर शुक्रवारी जनता दरबाराचं आयोजन करणार आहेत. मुख्यमंत्री कार्यालयानं जारी केलेल्या निवेदनात ही माहिती दिली आहे.