भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार बिशनसिंग बेदी यांचं निधन

 


नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : माजी क्रिकेटपटू आणि भारताचे माजी कर्णधार बिशनसिंग बेदी यांचं आज दिल्लीत निधन झालं.ते ७७ वर्षांचे होते.दोन आठवड्यांपूर्वी त्यांच्यावर शस्त्रक्रिया झाली होती. १९६७ ते १९७९ या १२ वर्षांच्या कारकिर्दीत त्यांनी भारतासाठी ६७ कसोटी सामन्यात २६६ बळी घेतले आहेत तर १० एकदिवसीय सामन्यात सात बळी घेतले आहेत.त्यांनी २२ कसोटी सामन्यांसाठी भारताचं कर्णधारपद भूषवलं आहे. बिशन सिंग बेदी हे फिरकी गोलंदाजी साठी प्रसिद्ध होते.  १९७० साली त्यांना पद्मश्री पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं.बिशन सिंग बेदी यांच्या निधनाबद्दल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, क्रीडा मंत्री अनुराग सिंग ठाकूर यांनी दुःख व्यक्त केलं आहे.