मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज दुसरा दिवस

 


मुंबई (वृत्तसंस्था) : मराठा आरक्षणासाठी जालना जिल्ह्यात आंतरवली सराटी इथं मनोज जरांगे पाटील यांनी सुरु केलेल्या उपोषणाचा आज दुसरा दिवस असून आजही त्यांनी अन्न-पाणी, तसंच औषध उपचार घेतला नाही. त्यांच्या तपासणीसाठी आलेल्या पथकाला त्यांनी तपासणी करू न देता परत पाठवलं. त्यांच्या आंदोलनात सहभागी होत विविध ठिकाणी सकल मराठा समाजानं साखळी उपोषण सुरु केलं आहे. मराठा समाजाला लवकरात लवकर कुणबी प्रमाणपत्र द्यावं, आणि दाखल झालेले गुन्हे मागं घ्यावेत, अशी आंदोलकांची मागणी आहे. बीड जिल्ह्यात, या मागणीसाठी आंदोलक तरूणांनी गेवराई तालुक्यात मादळमोही इथं ग्रामपंचायतीच्या मनोऱ्यावर चढून आंदोलन केलं. तर, पेंडगाव आणि पंचक्रोशीतल्या मराठा आंदोलकांनी आजपासून साखळी उपोषण सुरू केलं.