केंद्रीय गृहमंत्री विशेष मोहीम पदकासाठी सीआरपीएफ, एनआयए आणि एनसीबीच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची निवड

 


नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय गृहमंत्री विशेष मोहीम पदकासाठी सीआरपीएफ अर्थात केंद्रीय राखीव पोलीस दल, एनआयए अर्थात राष्ट्रीय तपास संस्था, एनसीबी नार्कोटिक्स ब्युरोचे अनेक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची निवड या पुरस्कारासाठी झाली आहे.  दहशतवाद प्रतिबंध, सीमेवरची कारवाई, शस्त्र नियंत्रण, मादक पदार्थांची तस्करी रोखणं आणि शोध मोहिमा राबवणं यात उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांना हा पुरस्कार दिला जातो असं गृह मंत्रालयानं म्हटलं आहे. २०१८ मधे या पुरस्काराची सुरूवात झाली.