माजी केंद्रीय राज्यमंत्री बबनराव ढाकणे यांचं निधन

 


मुंबई (वृत्तसंस्था) : माजी केंद्रीय राज्यमंत्री बबनराव ढाकणे यांचं काल रात्री निधन झालं. ते ८७ वर्षांचे होते. न्यूमोनिया झाल्यामुळे गेल्या तीन आठवड्यांपासून त्यांच्यावर अहमदनगर इथल्या एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरु होते. काल रात्री त्यांना हृदयविकाराचा झटका आल्यानंतर त्यांचं निधन झालं. राज्यात त्यांनी सार्वजनिक बांधकाम, ग्राम विकास खात्याचं मंत्रीपद भूषवलं होतं. उद्या दुपारी दोन वाजता पागोरी पिंपळगाव इथं त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. ढाकणे यांच्या निधनाबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शोक व्यक्त केला आहे. ढाकणे यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला दिले आहेत.