प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी कृषी शास्त्रज्ञ प्रोफेसर एमएस स्वामीनाथन यांच्या योगदानाचे केले स्मरण

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) प्रसिद्ध कृषी शास्त्रज्ञ प्रोफेसर एमएस स्वामीनाथन यांनी कृषी क्षेत्रात दिलेल्या योगदानाबद्दलच्या आठवणींना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज आपल्या लेखातून उजाळा दिला. स्वामिनाथन यांनी केलेल्या कार्यामुळे भारताला अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण केलं असल्याचं मत मोदी यांनी व्यक्त केलं. देशानं एक दूरदर्शी व्यक्ती गमावला असून, ज्यांच योगदान नेहमीच सुवर्णाक्षरांनी कोरलं  जाईल असं प्रधानमंत्री  मोदी यांनी आपल्या लेखामध्ये म्हटलं आहे. प्रा. स्वामीनाथन यांच्या गहू संशोधनातल्या अग्रगण्य कार्यामुळे गव्हाच्या उत्पादनात लक्षणीय वाढ झाली असल्यांचं त्यांनी म्हटलं आहे. आज जग बाजरी किंवा श्रीअन्न यांना सुपरफूड म्हणून संबोधत आहे, परंतु प्रा. स्वामीनाथन यांनी १९९०  च्या दशकापासून बाजरीचं महत्व अधोरेखित केलं होतं. या लेखात प्रा. स्वामीनाथन यांच्याशी यांच्याशी झालेल्या संवादाबाबत सांगताना त्यांनी  मृदा आरोग्य कार्ड योजनेबाबत मौल्यवान मार्गदर्शन केल्याचं सांगितलं.