जी-20 देशांच्या पीठासीन अधिकाऱ्यांची नववी बैठक येत्या 12 आणि 13 तारखेला नवी दिल्ली इथं होणार

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) जी-20 देशांच्या पीठासीन अधिकाऱ्यांची ९ ववी बैठक या महिन्याच्या १२ आणि १३ तारखेला नवी दिल्ली इथं होणार असल्याची माहिती लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी आज बातमिदारांना दिली. जागतिक विषयांवर समांनांतर आव्हानांचं समाधान शोधण्यासाठी या बैठकीचं आयोजन केल्याचं बिर्ला यांनी सांगितलं.

यात समतापूर्ण, न्यायपूर्ण समाजाच्या निर्मितीसाठी कोणती पावलं उचलावीत, पर्यावरणपूरक जीवनशैलीसाठी काय करायला हवं, जगाला भेडसावणाऱ्या दहशतवादाचा बिमोड कसा करावा, इत्यादी विषयांवर या बैठकीत चर्चा होणार आहे. या दोन दिवसीय बैठकीत एकूण चार सत्र होणार आहेत. जवळपास ५० पीठासीन अधिकारी या बैठकीत सहभागी होणार असल्याचं बिर्ला म्हणाले.