राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांची ६ ऑक्टोबरला निवडणूक आयोगासमोर सुनावणी

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांना निवडणूक आयोगाने येत्या ६ ऑक्टोबरला सुनावणीसाठी बोलावलं आहे. दोन्ही गटांनी प्रत्यक्ष किंवा प्रतिनिधीमार्फत सुनावणीला उपस्थित राहावं असा आदेश आयोगाने दिला आहे. निवडणूक चिह्न आरक्षण आणि वाटप आदेश १९६८ च्या तरतुदींनुसार या प्रकरणी विस्तृत चौकशी आयोग करणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं. शरद पवार यांनी १९९९ मधे स्थापन केलेल्या या पक्षातून अलिकडेच अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली एक गट फुटला असून ४० आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा या गटाने केला आहे.