लोकसेभच्या मुदतपूर्व निवडणुका घेण्याचा केंद्र सरकारचा कोणताही विचार नसल्याचं माहिती प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांचं प्रतिपादन

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) लोकसेभेच्या मुदतपूर्व निवडणुका घेण्याची केंद्र सरकारची कोणताही विचार नाही, विरोधक खोटा प्रचार करुन देशवासियांना भरकटवण्याचा प्रयत्न करत आहेत, असा आरोप केंद्रीय माहिती आणि प्रसारणमंत्री अनुराग ठाकूर यांनी केला आहे.  पंजाब इथं कपुरथला मध्ये आयोजित “माझी माती माझा देश” कार्यक्रमानंतर एका खाजगी वृत्त वाहिनीला मुलाखत देताना त्यांनी हा आरोप केला. पाच राज्यातल्या विधानसभेच्या आगामी निवडणुका पुढे ढकलण्याचा केंद्र सरकारचा कुठलाही इरादा नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं. तामिळनाडुचे क्रीडामंत्री उदयनिधी यांनी सनातन धर्माविषयी केलेल्या टिप्पणीवर उत्तर देताना ते म्हणाले की, इंडिया आघाडी देशात धृवीकरण करण्याचा प्रयत्न करत आहे.