आदित्य एल1 या देशाच्या पहिल्या सौर मोहिमेनं पृथ्वीची कक्षा बदलण्याची दुसरी प्रक्रिया यशस्वीपणे पार पडल्याची इस्रोची माहिती

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) आदित्य एल1 या देशाच्या पहिल्या सौर मोहिमेनं पृथ्वीची कक्षा बदलण्याची दुसरी प्रक्रिया यशस्वीपणे पार पडल्याचं इस्रो, अर्थात भारतीय अंतराळ संशोधन संस्थेनं म्हटलं आहे.  इस्रोच्या टेलीमेट्री ट्रॅकिंग आणि कमांड नेटवर्कनं या प्रक्रियेचं संचालन केलं. गेल्या २ सप्टेंबर रोजी PSLV-C57च्या माध्यमातून, आदित्य एल-1 चं यशस्वीपणे प्रक्षेपण  करण्यात आलं होतं. आदित्य एल-1, येत्या १२५ दिवसांमधे  L-1 बिंदूवर म्हणजेच, ज्या ठिकाणी  सूर्य आणि पृथ्वीचं  गुरुत्वाकर्षण बल समान असेल, त्या  ठिकाणी पोहोचण्यापूर्वी पृथ्वीची कक्षा बदलण्याच्या आणखी चार प्रक्रिया पूर्ण करेल. येत्या 10 सप्टेंबर रोजी पहाटे अडीच वाजता, पृथ्वीची कक्षा बदलण्याची तिसरी प्रक्रिया नियोजित आहे.