भारताचं चांद्रयान ३ हे अंतराळयान आज संध्याकाळी ७ वाजता चंद्राच्या कक्षेत प्रवेश करेल - इस्रो

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) भारताचं चांद्रयान ३ हे अंतराळयान आज संध्याकाळी ७ वाजता चंद्राच्या कक्षेत प्रवेश करेल, त्यासाठी आपण सज्ज आहोत असं इस्रो अर्थात भारतीय अंतराळ संशोधन संस्थेनं म्हटलं आहे. या यानानं आत्तापर्यंत चंद्रपर्यंतचे सुमारे दोन तृतीयांश अंतर पार केलं आहे. चंद्राच्या कक्षेत प्रवेश केल्यानंतर ते अनेक वेळा चंद्राभोवती प्रदक्षिणा घालेल, आणि हळूहळू चंद्राच्या पृष्ठभागाच्या जवळ पोहचेल.

चंद्राच्या पृष्ठभागापासून १०० किमीच्या कक्षेपर्यंत पोहोचल्यावर, या यानापासून लँडर आणि रोव्हर वेगळे होतील, आणि चंद्राच्या पृष्ठभागावर अलगद उतरवण्यासाठीची प्रक्रिया सुरू होईल. या यानाने उड्डाण केल्यापासून ४० दिवसांच्या प्रवासानंतर म्हणजेच येत्या २३ ऑगस्टच्या सुमाराला चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ हे यान अलगद उतरवले जाणार आहे. यामुळे चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ यान उतरवणारा भारत जगातला पहिला देश ठरणार आहे, तर चंद्राच्या पृष्ठभागावर यान उतरवणारा जगातला चौथा देश ठरणार आहे. 

Popular posts
जल व्यवस्थापनासाठी लहान जल स्रोतांचं संवर्धन आणि पुनरुज्जीवन करणं आवश्यक - उपराष्ट्रपती
Image
‘बार्टी’च्या महासंचालकपदी धम्मज्योती गजभिये रुजू
Image
तिसऱ्या राष्ट्रीय पोषण महिन्यानिमित्त, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे नागरिकांना कुपोषण-मुक्त भारतासाठी प्रतिज्ञा घेण्याचे आणि योगदान देण्याचे आवाहन
Image
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी नाशिक शहर संघचालक नानासाहेब गर्गे यांचं निधन
Image
९२ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी छगन भुजबळ यांची निवड
Image