अमेरिकी संसदेचं शिष्टमंडळ येत्या १५ ऑगस्टला, स्वातंत्र्यदिन सोहळ्यात सहभागी होण्यासाठी भारतात येणार

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) अमेरिकी संसदेचं शिष्टमंडळ येत्या १५ ऑगस्टला, स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्यात सहभागी होण्यासाठी भारतात येणार आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी 15 ऑगस्टला लाल किल्ल्यावरुन जनतेला संबोधित करतील त्यवेळी हे शिष्टमंडळ उपस्थित राहणार आहे. शिष्टमंडळाचं नेतृत्व मायकेल वॉल्ट्ज आणिभारतीय वंशाचे अमेरिकन संसद सदस्य रो खन्ना याच्याकडे आहे.

हे शिष्टमंडळ व्यवसाय, तंत्रज्ञान, आणि मनोरंजन क्षेत्रातल्या दिग्गजांसह विविध क्षेत्रातल्या लोकांना भेटणार आहे. रिच मॅककॉर्मिक आणि एड केस यांच्यासह काँग्रेसचे डेबोरा रॉस, कॅट कॅमॅक, ठाणेदार आणि जास्मिन क्रॉकेट हे द्विपक्षीय गटाचे इतर सदस्य आहेत.सर्वात जुनी आणि सर्वात मोठी लोकशाही असलेल्या दोन देशांमधील आर्थिक आणि संरक्षण संबंध कसे मजबूत करता येतील यावर चर्चा करण्यासाठी आपण भारतात येणार आहोत, असं खन्ना यांनी सांगितलं. या वर्षी खन्ना आणि वॉल्ट्ज यांनी अमेरिकेत यासंदर्भात ऐतिहासिक भारत - अमेरिका परिषदेचं आयोजन केलं होतं.