दिव्यांगांच्या सर्व समस्या सोडवण्यासाठी येत्या डिसेंबरपर्यंत सर्वसमावेशक धोरण आणलं जाईल -आमदार बच्चू कडू

 

मुंबई (वृत्तसंस्था) : दिव्यांगांच्या सर्व समस्या सोडवण्यासाठी येत्या डिसेंबरपर्यंत सर्वसमावेशक धोरण आणलं जाईल, अशी ग्वाही 'दिव्यांग कल्याण विभाग, दिव्यांगांच्या दारी अभियान'चे अध्यक्ष आणि मुख्य मार्गदर्शक आमदार ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांनी दिली आहे. ते आज रायगड जिल्ह्यात पनवेल इथं 'दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगाच्या दारी' या अभियानाअंतर्गत आयोजित जिल्हास्तरीय मेळाव्यात बोलत होते. दिव्यांगांच्या कल्याणासाठी राज्य शासनानं 82 शासन निर्णय निर्गमित केले आहेत. दिव्यांगांना विविध योजनांचा लाभ देण्यासाठी जिल्हा प्रशासनानं पुढाकार घ्यावा, असं आवाहन त्यांनी केलं.