महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघटनेची ६३ वी वार्षिक परिषदेचं शरद पवार यांच्या हस्ते उद्घाटन

 

मुंबई (वृत्तसंस्था) : हवामान बदलाचा सर्वाधिक फटका द्राक्ष पिकाला बसत असून, त्यामुळे होणाऱ्या नुकसानीपासून द्राक्ष उत्पादकांना वाचवण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारनं धोरणात्मक निर्णय घेण्याची गरज आहे, असं माजी केंद्रीय कृषीमंत्री, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटलं आहे. महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघटनेची ६३ वी वार्षिक परिषद काल पुण्यात सुरु झाली. या परिषदेचं उद्घाटन शरद पवार यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते. 

तीन दिवस चालणाऱ्या या परिषदेला राज्यातून आणि राज्याबाहेरून द्राक्ष उत्पादक सभासद मोठ्या संख्येनं उपस्थित आहेत. अवकाळी पाऊस आणि गारपिटीपासून द्राक्ष पिकाचं संरक्षण करणाऱ्या प्लास्टिक आच्छादनासाठी, राज्यातल्या शेतकऱ्यांना आता केंद्र सरकारकडून भरीव आर्थिक मदत दिली जाणार असल्याचं यावेळी सांगण्यात आलं.

Popular posts
लाल समुद्र आणि एडनच्या आखातातल्या जहाजांवरचे हल्ले थांबवण्याचं संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेचं हौती दहशतवाद्यांना आवाहन
Image
राज्यातील कामगारांच्या अडचणींचे निराकरण करण्यासाठी संपर्क अधिकाऱ्यांची नियुक्ती - कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील यांची माहिती
Image
भारताला रशियाकडून एस ४०० क्षेपणास्त्र प्रणाली खरेदी करण्यावर निर्बंध न लादण्याचा अमेरिकेचा निर्णय
Image
तरुणांनी यशासाठी भव्य शक्यतांच्या अवकाशाचा शोध घेतला पाहिजे - उपराष्ट्रपती
Image
अंदमान निकोबार बेटं भारताला आग्नेय आशियाबरोबर जोडणारा दुवा
Image